Nuh Hindu Attacked : हरियाणातील मुसलमानबहुल पिंगावण भागात हिंदु कुटुंबियांवर आक्रमण !
|
नूंह (हरियाणा) -पिंगावण येथील अनुसूचित जातीतील एका हिंदु कुटुंबावर काही मुसलमानांनी आक्रमण केले. संतराम आणि अन्य यांच्यावर इद्रिस, जुनैद, जुबेर, अखलाक, जफर, अक्रम, शमीम, जावेद, अयुब अन् अन्य यांनी आक्रमण केल्याची तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आक्रमणकर्त्यांमध्ये साहुनी आणि रवीना अशा दोन महिलांचाही समावेश आहे. या सर्वांनी संतराम यांचे दुकान लुटल्याचा, तसेच त्यांच्या कुटुंबातील महिलांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाआरोप आहे. गाव सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही पीडितांचे म्हणणे आहे. पिंगावण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दलबीर सिंह यांना ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत इद्रिस आणि जुबेर या दोघांना अटक केली आहे.
१. पिंगावण क्षेत्रातील रानियाळा पाटकपूर येथे संतराम हे कुटुंबासह रहातात. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी सांगितले की, १६ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अखलाक, जुबेर आणि नाहिद यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. या वेळी तिन्ही आरोपींनी हातात पिस्तुल घेऊन कुटुंबातील रमेशचंद यांना गोळ्या घालण्याची धमकीही दिली होती. रमेशचंद यांनी १७ एप्रिलला पिंगावण पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीवरून पोलीस त्याच दिवशी सायंकाळी गावात तपासासाठी गेले.
२. रमेशचंद यांनी पोलिसांना दूरभाष केल्याने जुबेर आणि त्याचे साथीदार संतापले होते. संतराम हे किराणा दुकान चालवतात. पोलीस परतल्यानंतर १७ एप्रिलच्या रात्रीच इद्रिसने त्याच्या काही साथीदारांसह रमेशचंद, संतराम आणि राजेश यांच्यावर काठ्या अन् रॉड यांद्वारे आक्रमण केले.
३. तिघे हिंदु घायाळ झाल्याचे पाहून आक्रमणकार्यांनी त्यांचे दुकान लुटण्यास आरंभ केला. संतराम यांच्या पाकिटातून २३ सहस्र रुपये चोरण्यात आले. घरातील महिलांनी आक्रमणकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांचाही विनयभंग करण्यात आला. जुनैदने एका हिंदु महिलेचे कपडेही फाडले.
४. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. त्यामुळे आक्रमणकर्ते पळून गेले. पळून जातांना इद्रिस म्हणाला की, आज पोलिसांनी तुम्हाला वाचवले. भविष्यात संधी मिळाली, तर आम्ही त्याला (संतरामला) मारून टाकू. संतराम यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या कुटुंबियांवर गाव सोडून धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही नमूद केले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांच्या जीवित आणि मालमत्ता यांचे रक्षण करण्याची मागणी संतराम यांनी केली आहे. तक्रारदार संतराम यांनी सांगितले की, त्यांचे गाव मुसलमानबहुल असून तिथे हिंदूंची केवळ ४-५ घरे आहेत.
संपादकीय भूमिकाबहुसंख्य हिंदूंच्या देशात मुसलमानबहुल भागात हिंदु त्यांचा जीव मुठीत धरून रहातात. धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेल्या भारतात ही स्थिती लज्जास्पद ! |