दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…
नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !
नागपूर – आज सकाळची केडीके महाविद्यालयातील मतदान कक्ष क्रमांक ५ च्या समोर गवतामध्ये मोठा साप आल्याने गोंधळ उडाला होता. मतदानासाठी आलेल्या मोहनीश मोहाडीकर या युवकाने याची माहिती ‘वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी’ला दिल्यावर त्यांच्या सदस्यांनी येथे येऊन हा विषारी साप पकडला.
तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र
नागपूर – येथे तृतीय पंथियांसाठी विशेषत्वाने मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या ‘इंद्रधनुष थीम’ मतदान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी भेट दिली.
माझ्यासमवेत मोदी सभा घेणार असल्याचे वृत्त खोटे ! – राज ठाकरे
मुंबई – माझ्यासमवेत नरेंद्र मोदी सभा घेणार असल्याचे वृत्त खोटे आहे. हे वृत्त निराधार आहे, असे स्पष्टीकरण मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पुणे येथे गेले असतांना तेथे पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना नरेंद्र मोदी मुंबईत राज ठाकरे यांच्यासमवेत प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितल्याचे वृत्त काही प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. याविषयी राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर सांगितले.