हनुमान जयंतीनिमित्त हनुमंताविषयी भावप्रयोग चालू असतांना हनुमंताचे अस्तित्व जाणवणे !
‘भक्तीसत्संगात हनुमान जयंतीनिमित्त हनुमंताविषयी भावप्रयोग चालू असतांना मला भावप्रयोगातील शब्द ऐकू येत होते; पण ते कळत नव्हते. भावप्रयोगाच्या वेळी मला ध्यान लागल्यासारखे वाटत होते. ‘भावप्रयोग चालू असतांना सभागृहात हनुमंत येत आहे’, असे मला जाणवत होते. ‘तो येत आहे, असे दिसत नव्हते; पण त्याच्या पावलांचे ठसे लादीवर उमटत आहेत’, असे मला दिसत होते. यातून मला हनुमंताच्या अस्तित्वाची अनुभूती घेता आली. हे गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने अनुभवता आले, त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’ – कु. वैदेही खडसे (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |