एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
‘गिरकारवाडा, हरमल (गोवा) येथील २१६ पैकी ८८ जणांना अनधिकृत बांधकाम पाडण्याविषयी, तर ५३ व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याविषयी नोटीस बजावल्याची माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे. हरमल पंचायतीने गोवा खंडपिठाला सांगितले आहे की, गिरकारवाडा, हरमल येथील एकूण १२५ बांधकामे पाडण्याची प्रक्रिया चालू आहे. यामधील ८८ जणांना बांधकाम पाडण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे, तर उर्वरितांना पुढील १५ दिवसांत नोटीस पाठवण्यात येणार आहे.’ (१६.४.२०२४)