अयान पठान याच्याकडून हिंदु प्रेयसीला अमानुष मारहाण; जखमांवर तिखट टाकले !
गुना (मध्यप्रदेश) येथील भयावह घटना !
|
भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील गुना जिल्ह्यात अयान पठान नावाच्या एका मुसलमान युवकाने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीच्या आईचा याला विरोध होता. त्यामुळे मुलगी घर सोडून शेजारीच रहात असलेल्या अयानकडे गेली. त्याने तिला घरात बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केला. तिची वडिलोपार्जित संपत्ती त्याच्या नावे करण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणू लागला. याला विरोध केल्याने त्याने तिला मारहाण करणे आरंभिले. मारहाण केल्यावर तिच्या जखमांवर तो तिखट टाकत असे. १ महिना हा प्रकार चालू होता. १६ एप्रिलच्या रात्री अयानने तिला पुन्हा अमानुष मारहाण केली. त्यात ती घायाळ झाले. तिने ओरडू नये, यासाठी त्याने ‘फेविक्विक’ने तिचे ओठ चिकटवले. शेवटी त्याच रात्री ती घर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाली. ५ किलोमीटर चालत जाऊन ती पोलीस ठाण्यात पोचली. तिची गंभीर स्थिती पाहून पोलिसांनी अयानच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पीडितेच्या आईने तिला जिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.
Ayan Pathan brutally assaults Hindu girlfriend; sprinkles chili powder on wounds
Horrific incident in Guna (Madhya Pradesh)
Lips glued with Fevikwik to prevent her from shouting
Held captive and raped
Read more : https://t.co/KBtSGCI6Yf
'The incident is not a case of ‘Love… pic.twitter.com/23mWGWdN93
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 21, 2024
घटना लव्ह जिहादची नसल्याचे गुना येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षकाचा दावा !‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने गुना जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मान सिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दावा केला की, ही घटना लव्ह जिहादचा प्रकार नसून पीडिता गरीब कुटुंबातील आहे. तिचे आणि अयानचे २ वर्षांपासून प्रेम होते. अयानने ‘तिची संपत्ती मिळावी’, यासाठीच तिला मारहाण केली. |
संपादकीय भूमिकामहिलांवरील अत्याचारांच्या घटना घडू नयेत, यासाठी अशा बलात्कार्यांना आता मृत्यूदंडाची शिक्षा करणेच आवश्यक आहे, हे जाणा ! |