Hubbali Love Jihad Murder : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या !
|
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील बीव्हीबी महाविद्यालयाच्या परिसरात १८ एप्रिल या दिवशी प्रेमप्रकरणातून काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. आरोपी तरुणाने नेहा हिरेमठ (वय २३ वर्षे) या तरुणीचे पोट आणि मान यांवर ७ वार केले. तिला रुग्णालयात नेण्यात आल्यावर मृत घोषित करण्यात आले. आक्रमणानंतर आरोपी फैयाज खोंडुनाईक पळून जात असतांना काही विद्यार्थ्यांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. नेहा या महाविद्यालयाच्या ‘एम्.सी.ए.’च्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. आरोपी फैयाज हाही याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. ते दोघेही बी.सी.ए.च्या काळात वर्गमित्र होते. नेहाने फैयाजचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला होता, त्यामुळे त्याने तिची हत्या केली.
VIDEO | “After my daughter’s classes ended at 4:30 pm, she came out of her college and an unknown man attacked her by stabbing. She died on the spot,” says the father of the Hubballi murder victim Niranjan Hiremath. pic.twitter.com/micMenry7R
— Press Trust of India (@PTI_News) April 18, 2024
या प्रकरणाविषयी नेहाचे वडील आणि नगरसेवक हिरेमठ यांनी सांगितले की, आरोपीने माझ्या मुलीला विवाहासाठी विचारले होते; मात्र तिने त्याचा प्रस्ताव नाकारला होता. ती या गोष्टींपासून दूर रहायची. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याचे नेहाने आरोपीला सांगितले होते.
आरोपीला अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या
या घटनेविषयी राज्यातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले आहे की, मी पोलीस महासंचालकांना सखोल अन्वेषण करण्याचा आणि आरोपीला अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेश दिला आहे.
हे लव्ह जिहादचे प्रकरण नाही ! – गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर
हुब्बळ्ळी येथे झालेली नेहा हिची हत्या, हे लव्ह जिहादचे प्रकरण नाही. ही केवळ दोन धर्मांमध्ये घडलेली घटना आहे. नेहा पहिल्यापासून फैयाजवर प्रेम करत होती. हे तिच्या घरच्यांना समजले. घरच्यांनी तिला समजावून ‘हे येथेच थांबव’, असे सांगितले. नेहादेखील घरच्यांनी जसे सांगितले, त्याचा स्वीकार करून तसेच वागू लागली; परंतु हा विचार त्या युवकाला सहन न झाल्याने त्याने तिची हत्या केली आहे. घटना प्रत्यक्ष घडली, त्या वेळी नेहाची आई तिच्यासह होती. तिच्यावरदेखील आक्रमण करण्यात आले; परंतु नेहाने आईचे रक्षण केले. हे लव्ह जिहादचे प्रकरण नाही. ‘मला सोडून दुसर्याशी विवाह करणार का?’ या रागाने त्याने हत्या केली आहे. अशा घटना आकस्मिकपणे घडतात. निवडणुकांच्या तोंडावर या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात येत आहे. हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी व्यक्त केली.
संपादकीय भूमिका
|