Pakistani Weapons Delivery To Kashmir : खलिस्तानवाद्यांच्या साहाय्याने पाकमधून पंजाबमार्गे काश्मीरमध्ये पोचत आहेत शस्त्रास्त्रे !

कलम ३७० रहित झाल्यापासून पाकमधून थेट काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रे पाठवण्याला मर्यादा !

नवी देहली – लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेला काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रे मिळण्याच्या पद्धतीत आता पालट झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. कलम ३७० रहित होण्याच्या आधीपर्यंत पाकिस्तानमधून आतंकवादी थेट काश्मीरमध्ये शस्त्रे पाठवत असत. हे कलम रहित झाल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या चोख संरक्षणामुळे काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रे थेट पोचू शकत नसल्याचे पाहून पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पंजाबमार्गे शस्त्रास्त्रांचा पुरवठा चालू केले. पंजाबातील खलिस्तानी आतंकवाद्यांच्या माध्यमातून ही घातक शस्त्रे काश्मीरमध्ये पोचवली जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. शस्त्र पुरवठ्याचे काम ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ आणि ‘खलिस्तान लिब्रेशन आर्मी’ यांच्या माध्यमातून केले जात आहे.

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा आतंकवादी रमणदीप सिंह उपाख्य रमण हा पंजाबमधील फिरोजपूरचा रहिवासी असून तो या प्रकरणात मुख्य भूमिका बजावत आहे. रमण यापूर्वी देशी बनावटीची पिस्तुले आणि इतर अनेक शस्त्रे यांची देशभरात तस्करी करत होता. त्याचा माग घेण्यासाठी सुरक्षायंत्रणा युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत.

संपादकीय भूमिका

बंगालप्रमाणेच पंजाबमध्येही राष्ट्रपती राजवट का लागू केली पाहिजे, हेच या प्रकारावरून लक्षात येते.