आचारसंहितेचा भंग करणार्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रहित करा ! – अतुल लोंढे
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर भित्तीपत्रके लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाचे विज्ञापन करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रहित करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणूक प्रचार चालू झाल्यापासून सत्ताधारी भाजप, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे आणि त्या संदर्भातील रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे, असे ते म्हणाले.