पुणे येथे सौ. सुप्रिया सुळे, सौ. सुनेत्रा पवार, डॉ. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज प्रविष्ट !
पुणे, १८ एप्रिल (वार्ता.) – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिसर्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १८ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. अर्ज प्रविष्ट करण्याच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून, शिरूर लोकसभा मतदारसंघातून मविआकडून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून मविआच्या सौ. सुप्रिया सुळे यांनी स्वत:चा उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे. ‘महायुती’कडून बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उमेदवारी अर्ज प्रविष्ट केलेल्या उमेदवारांनी स्वत:च्या प्रचाराचा प्रारंभ केला. सौ. सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबियांची परंपरा असलेल्या श्री क्षेत्र कण्हेरीच्या मारुतिरायाला श्रीफळ वाढवून प्रारंभ केला.