अध्यात्म हे प्रायोगिक असल्यामुळे, त्यासंदर्भातील वाचलेल्या ज्ञानानुसार तत्परतेने कृती करा !
‘काही जण आयुष्यभर अध्यात्माच्या संदर्भातील ग्रंथांचे वाचन करण्यावर भर देतात. स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी ‘मी अध्यात्माच्या संदर्भातील इतके इतके ग्रंथ वाचले आहेत’, असेही सांगतात. प्रत्यक्षात वाचलेले ज्ञान जोपर्यंत कृतीत आणत नाही, तोपर्यंत त्या वाचनाचा उपयोग होत नसतो आणि कृती केली नाही, तर वाचनाचा वेळही वाया गेल्यासारखे असते. यासाठी केवळ ग्रंथ वाचण्यात आयुष्य वाया घालवू नका, तर ग्रंथातील जे शिकण्यासारखे आहे, ते तत्परतेने कृतीत आणा.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.