Lok Sabha Voting : लोकसभेसाठी १९ एप्रिल या दिवशी पहिल्या टप्प्यातील मतदान !
नवी देहली – लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल या दिवशी होत आहे. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील १०२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यामध्ये १६ कोटी ६३ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. लोकसभेसाठी एकूण ७ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.