श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक वाद्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला !
तुळजापूर – येथील श्री तुळजाभवानी मंदिरात हलगीसह इतर पारंपरिक वाद्ये नेण्यास सुरक्षारक्षकांनी अचानक नकार दिला आहे. या संदर्भात मंदिर समितीने वाद्य बंदीचा कोणताही आदेश काढलेला नसतांना सुरक्षारक्षक मात्र ‘वरिष्ठांचा आदेश आहे’, असे सांगत आहेत. या संदर्भात सुरक्षारक्षक मनमानी कारभार करत असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
१. तुळजाभवानी मंदिरात विविध कुलधर्म, कुलाचार पूजा करण्याची प्रथा परंपरागतपणे चालू आहे. यात खणा-नारळाने ओटी भरणे, अभिषेक पूजा, जागरण, गोंधळ, जावळ, कुंकवाचा सडा, माळ-परडी यांसह अनेक विधी करण्यात येतात. श्री तुळजाभवानीमातेचा गोंधळ घालण्याचीही प्राचीन परंपरा आहे.
२. या सर्व प्रथा-परंपरा पाळतांना पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. विधीसाठी भाविक वाजत-गाजत देवीच्या मंदिरात येतात. बंदी घातल्याने ही परंपरा मोडीत निघण्याची भीती आहे.
३. मंदिर समितीच्या सुरक्षारक्षकांनी अचानक पारंपरिक वाद्यांना प्रवेश नाकारल्याने प्रथा मोडीत निघण्याची भीती आहे.
४. हे सुरक्षारक्षक महाद्वार येथेच भाविकांना रोखत आहेत. या संदर्भात मंदिराचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
संपादकीय भूमिकामंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! |