Ram Navami Attack Bokaro: बोकारो (झारखंड) येथे मशिदीजवळ रामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण : १२ जण घायाळ
बोकारो (झारखंड) – येथे रामनवमीच्या निमित्ताने काढण्यात येणारी मिरवणूक धर्मांध मुसलमानांनी मशिदीसमोर रोखली. यानंतर मिरवणुकीवर दगडफेक झाली. तसेच काही वाहनेही जाळण्यात आली. यात १२ हून अधिक हिंदू घायाळ झाले. तसेच एक पोलीसही घायाळ झाला. सध्या या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या मार्गावरील घरांच्या छतांचे ड्रोनद्वारे निरीक्षण करून छतांवर दगड ठेवणार्यांना दगड हटवण्याची चेतावणी दिली होती.
संपादकीय भूमिकाभारतात रामनवमीची मिरवणूक काढणे आणि ती मशिदीच्या जवळील मार्गावरून नेणे गुन्हा झाला आहे, असेच चित्र गेली अनेक वर्षे पहायला मिळत आहे; मात्र तरीही शासनकर्ते अन् पोलीस हिंदूंचे रक्षण करू शकत नाही. हे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद ! |