राज्यात पुढील ४ दिवस अवेळी पावसाची शक्यता !
मुंबई – कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील जिल्ह्यांमध्ये येत्या ४ दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.