रांजणगाव (पुणे) येथे घरफोड्या करणार्या २ धर्मांधांना अटक !
रांजणगाव (जिल्हा पुणे) – रांजणगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम्.आय.डी.सी.) पोलिसांनी घरफोडी करणार्या रेहान नदाफ आणि झेद शेख यांना अटक केली आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गाजवळ असलेल्या ‘हॉटेल अमर इन’मधून रात्रीच्या वेळी २ भ्रमणभाष आणि ३० सहस्र रुपये चोरांनी पळवले होते. त्याविषयी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याचे अन्वेषण करतांना या दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, घरफोडी केल्याचे चोरांनी मान्य केले आहे.
संपादकीय भूमिका :अशांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! |