महाराष्ट्रात मतदानाच्या आवाहनासाठी निवडणूक आयोग घेणार प्रसिद्ध व्यक्तींचे साहाय्य !
मुंबई – महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोग प्रसिद्ध व्यक्तींचे साहाय्य घेणार आहे. नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी निवडणूक आयोगाने कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक आदी क्षेत्रांतील १६ प्रसिद्ध व्यक्तीचे साहाय्य घेणार आहे. याव्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून जिल्हास्तरावरही सदिच्छादूतांचे साहाय्य घेण्यात येणार आहे.
राज्यस्तरावर आवाहन करण्यासाठी पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, अभिनेत्री सान्वी जेठवानी, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना, सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे यांसह काही तृतीयपंथी आणि दिव्यांग व्यक्ती यांचे साहाय्य निवडणूक आयोग घेणार आहे.
संपादकीय भूमिका :प्रसिद्ध व्यक्तींच्या आधाराने नव्हे, तर लोकप्रतिनिधींचे कार्य पाहून कधी मतदान होणार ? |