छत्तीसगडमध्ये मशिदीच्या इमामकडून महिलेवर बलात्कार : तक्रारीनंतर पसार !
(इमाम म्हणजे मशिदीमध्ये नमाज शिकवणारा)
रायपूर – छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात एका मशिदीच्या इमामाने एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुलाम गौस असे आरोपी इमामाचे नाव असून तो पाणी मागण्यासाठी महिलेच्या घरात घुसला होता.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सूरजपूर जिल्ह्यातील चौकी भागात बसदेई येथे घडली. येथील एका मशिदीत इमाम गुलाम घौस स्थानिक लोकांना नमाज शिकवत होता. २६ वर्षीय पीडितेचे घर मशिदीपासून हाकेच्या अंतरावर आहे. १० एप्रिलला संध्याकाळी इमाम पीडितेच्या घरी गेला आणि तिच्या पतीविषयी विचारत घरात घुसला. ओळख असल्याने महिलेने त्याला घरात प्रवेश दिला. गुलाम गौस याने तिच्याकडे पाणी मागितले. महिला पाणी घेऊन परतली तेव्हा इमामने तिला वाईट हेतूने पकडले. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु गुलाम गौसने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने महिलेला धमकावून तेथून पळ काढला. पीडित महिलेने घडलेला प्रकार पतीला सांगितला.
पीडितेच्या पतीने इमामच्या विरोधात बसदेई पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुलाम गौस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा नोंद होताच गुलाम गौस पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिका‘भारतात अल्पसंख्यांक संकटात आहेत’, असा खोटा अहवाल देणारी अमेरिका आता ‘भारतात अल्पसंख्यांकांमुळे इतर संकटात आहेत’, असा अहवाल देण्याचे धाडस दाखवेल का ? |