कोल्हापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन !
कोल्हापूर – श्रीरामनवमीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात, तसेच कर्नाटक येथे २० ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या सर्व प्रदर्शनांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निपाणी (कर्नाटक) येथील प्रदर्शन कक्षास भाजपच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ खरेदी केले.