एकनाथ खडसे यांना अमेरिकेतून धमकीचे दूरभाष !
दाऊद आणि छोटा शकील टोळीने संपर्क केल्याचा दावा मुक्ताईनगरमध्ये तक्रार प्रविष्ट !
जळगाव – सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असलेले एकनाथ खडसे यांना ४ वेगवेगळ्या भ्रमणभाष क्रमांकांवरून दाऊद आणि छोटा शकील टोळींकडून धमकीचे दूरभाष आले आहेत. या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या वतीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘या प्रकरणाचे अन्वेषण स्थानिक पोलीस करत असून त्यांचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे’, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.