रामनवमीनिमित्त पुणे जिल्ह्यातील प्रवचन, नामजप ग्रंथप्रदर्शन कक्ष यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
पुणे, १७ एप्रिल (वार्ता.) – रामनवमीच्या निमित्ताने १७ एप्रिल या दिवशी पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे जिल्ह्यातील श्रीराम मंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यात आले. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रामनवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने कार्यरत असते. याचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने श्रीरामनवमी सामूहिक नामजप आणि प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्रीरामनवमीचे महत्त्व सांगून आणि श्रीरामनामाचा जप करून श्रीरामाची कृपा संपादन करण्याविषयी उपस्थितांना सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यात सत्संगातील जिज्ञासूंनी प्रभु श्रीरामचंद्राची कृपा संपादन करण्यासाठी फलकप्रसिद्धीची सेवा तळमळीने केली.
वैशिष्ट्यपूर्ण
१. १७ एप्रिल या दिवशी गावठाण येथे तुळशीबाग राममंदिरात लावण्यात आलेल्या कक्षाला श्रीरामाच्या कृपेने समाजातून उदंड प्रतिसाद मिळाला.
२. श्री. आदमाने यांच्या श्रीराममंदिरात सनातन संस्थेच्या वतीने ८ दिवस प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
३. जुन्नर येथे भवाळकरांचे राममंदिर येथे प्रतिदिन पाडवा ते रामनवमी या कालावधीत रामरक्षास्तोत्र पठण, मारुति स्तोत्र आणि आरती घेण्यात आली.
४. या वेळी विविध मान्यवरांनीही ठिकठिकाणच्या प्रदर्शन कक्षांना भेटी दिल्या.