अर्जुनासमवेत कृष्ण रमला, हिंदु राष्ट्र स्थापण्याला ।
ज्ञानाचे हे अमृत पाजूनी ।
पहा रे साधक तो सनातनी ।। १ ।।
मायाजाळाची सुंदर सृष्टी ।
मौजमजा नि करती मस्ती ।। २ ।।
कलियुगी रे ज्यांची वस्ती ।
स्वभावदोष नि अहंकारी दृष्टी ।। ३ ।।
घोर कलियुग ही तर कोळशाची खाण ।
हिरे वेचियते हे तेची सनातन ।। ४ ।।
चमचम करती त्या हिरकण्या ।
वेचूनी घेती कोळशाच्या खाणीतल्या ।। ५ ।।
रत्नपारखी तो रत्नाला ।
धागा मिळतो धाग्याला ।। ६ ।।
अशा धर्माभिमान्याला ।
कसे जोडले सनातनला ।। ७ ।।
अनुभूतीची भरून शिदोरी ।
तेजाने झाली ती साजरी ।। ८ ।।
गुरुधनाची ही गं तिजोरी ।
हिंदु राष्ट्र झळकले पृथ्वीवरी ।। ९ ।।
रत्नपारखी तो रत्नाला ।
धर्माभिमानी जोडला सनातनला ।। १० ।।
अर्जुनाच्या समवेत कृष्ण हा रमला ।
हिंदु राष्ट्र स्थापण्याला ।। ११ ।।
हर हर महादेव । जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।
इदं न मम ।’
– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६६ वर्षे), वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |