Ram Lalla’s Surya Tilak: अयोध्येत अद्वितीय रामनवमी साजरी : श्री रामलल्लाचा झाला पहिला सूर्यतिलक !
(सूर्यतिलक म्हणजे सूर्यकिरणांनी केला जाणारा भगवंताचा अभिषेक !)
अयोध्या (उत्तरप्रदेश) – यंदा झालेली रामनवमी अत्यंत विशेष होती. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. २५ पिढ्यांनंतर हा दैवी दिवस पहाणारी आजची पहिलीच पिढी आहे.
Ram Navami celebrations in #Ayodhya like never before :
Shree Ram Lalla’s first ever Surya Tilak performed !
सूर्य तिलक #रामनवमी
भारतीय संस्कृति pic.twitter.com/13L1W5kSzb— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2024
श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिरात दुपारी १२ वाजल्यापासून श्री रामलल्लाचा सूर्यतिलक करण्यात आला. दुपारी १२ वाजता अभिजीत मुहूर्तावर ३ मिनिटांसाठी रामलल्लाला सूर्यतिलक करण्यात आला. यासाठी आयआयटी रूडकीने बनवलेल्या ‘ऑप्टोमेकॅनिकल’ (प्रकाश आणि यंत्र यांच्या तंत्रज्ञानाच्या) पद्धतीचा अवलंब करून हा सूर्यतिलक घडवून आणण्यात आला.
सौजन्य Business Today
अशी साजरी करण्यात आली रामनवमी !
१. पहाटे ३.३० वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. अन्य दिवशी ते सकाळी ६.३० वाजता उघडण्यात येतात. रात्री ११.३० वाजेपर्यंत म्हणजेच २० घंटे भाविकांना दर्शन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.
२. रामलल्ला सदन येथे रामजन्मोत्सव करण्यात आला. जगद्गुरु राघवाचार्य यांनी श्री रामलल्ला याला ५१ कलशांनी अभिषेक केला. लक्षावधी रामभक्तांनी आराध्य श्रीरामाचे दर्शन घेतले.
३. अयोध्येतील अनुमाने १० सहस्र मंदिरांमध्ये श्रीरामाची स्तुती केली जात आहे. श्री रामलल्लाच्या जयंतीनिमित्त श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, महासचिव चंपत राय, सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्यासह उत्तरप्रदेशचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार, अयोध्येचे जिल्हाधिकारी नितीश कुमार आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.