Dubai Flood : दुबईला मुसळधार पावसाचा फटका !
ओमान आणि बहरिन येथेही पूरस्थिती
दुबई (संयुक्त अरब अमिरात) – येथे १६ एप्रिलला मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. येथील विमानतळ, रेल्वे आणि मेट्रो यांचे मार्ग, रस्ते आदी ठिकाणी पाणीच पाणी दिसून आले. या पाण्याचा दुसर्या दिवशीही निचरा होऊ शकला नाही. पावसामुळे येथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विमानांचा मार्ग पालटण्यात आला आहे. प्रशासनाने शाळांना सुटी दिली आहे, तर नागरिकांना आवश्यक असेल, तरच बाहेर पडण्याची सूचना दिली आहे.
Dubai hit by heavy rains#Oman and #Bahrain too experience flood situation
pic.twitter.com/qXw6dc2RS7— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 17, 2024
सामाजिक माध्यमांतून या पूरस्थितीचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. येथील व्यापारी संकुलांमध्ये गुडघाभर पाणी भरले आहे. बहारीन, ओमान, अबू धाबी आणि शारजा येथेही पूरस्थिती निर्माण झाली. ओमानमध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे.