पुणे येथे आय.पी.एल्.च्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणार्यांना अटक !
पुणे – कोथरूड भागातील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील ‘पटेल टेरेस’ इमारतीमध्ये आय.पी.एल्.च्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणार्या १० जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून भ्रमणसंगणक, भ्रमणभाषसंच असा २ लाख २० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या १० जणांपैकी ७ जण मूळचे छत्तीसगडचे आहेत.