दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !
|
दोंडाईचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली. या प्रकरणी दगडफेक करणार्या २१ धर्मांधांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत ७ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून अधिकची पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. साहिल लाला बागवान, समीर बागवान, इसाक मिस्तरी, कल्लू पठाण, विहान बागवान, कौसर खाटीक, आज्या खाटीक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
Stone pelting by #FANATICS at Dr Babasaheb #Ambedkar 's anniversary procession in Dondaicha (Dhule, Maharashtra)
— Charges of rioting registered against 21 individuals
— 7 fanatics arrested so far
This clearly shows that, in the eyes of the fanatics, everyone except Mu$lims… pic.twitter.com/BuoJrrjMsY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 17, 2024
या प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रहाणारे गोविंदा नगराळे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. त्यात म्हटले आहे की, १५ एप्रिलच्या रात्री १०.४५ वाजता शहरातील जामा मशिदीपुढील डॉ. आंबेडकर पुतळा चौकाकडे जाणार्या रस्त्यावरून मिरवणूक जात होती. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रवेशद्वाराजवळ मार्गस्थ होत असतांना एका गटाने ही मिरवणूक रस्त्यावरून जाऊ नये; म्हणून मिरवणुकीवर दगडफेक करण्यास प्रारंभ केला. यामुळे मिरवणुकीतील काही जण घायाळ झाले. संबंधित गटातील लोकांनी आरडाओरड करून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. सर्व आरोपी दोंडाईचा येथेच रहाणारे आहेत.
या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी नीलेश मोरे यांनी तात्काळ पोलीस मुख्यालयाला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दंगल नियंत्रक पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण, तसेच शीघ्र कृती दलाचे पथक तैनात केले होते.
या प्रकरणी धुळे येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की, शहरात कोणतीही मोठी अनुचित घटना घडलेली नाही. किरकोळ घटना घडली असून संबंधितांवर कारवाई केली जाईल. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
संपादकीय भूमिका
|