काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष आवेदन भरले !
सांगली येथे महाविकास आघाडीला धक्का !
सांगली, १६ एप्रिल (वार्ता.) – काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या सांगली येथे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून सांगली मतदारसंघातून अपक्ष आवेदन भरले आहे. महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाकडून सांगली येथे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती.
विशाल पाटील काँग्रेस पक्षाकडूनही दुसरे आवेदनही भरणार आहेत. १६ एप्रिल या दिवशी विशाल पाटील यांच्याकडून सांगली येथे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. विशाल पाटील म्हणाले की, भाजपला पाडण्यासाठी सक्षम उमेदवाराची अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही. पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाईल.