भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार ! – अमेरिका
वॉशिंग्टन – भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
भारतातील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेत भारत सरकारवर टीका करणारे काही लेख प्रकाशित झाले आहेत. याविषयी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना मॅथ्यू मिलर यांनी अमेरिकेचे भारताशी चांगले संबंध असल्याचे अधोरेखित केले. ‘भारत हा जगातील सर्मांत मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे तो अमेरिकेसाठी महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे आणि भविष्यातही तो राहील’, असेही मिलर यांनी स्पष्ट केले.