सावदा (जिल्हा जळगाव) येथे श्रीरामनवमीनिमित्त भव्य पालखी सोहळा आणि महाप्रसाद !
जळगाव, १६ एप्रिल (वार्ता.) – सावदा येथे श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले असून येथील प्रभु श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ ते ८ या वेळेत श्रीरामाची पूजा अन् अभिषेक, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत श्रीराम जन्मोत्सवाचे संजयबुवा कुळकर्णी यांचे कीर्तन, तर दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव होईल. संध्याकाळी ६ वाजता येथील राममंदिरापासून भव्य श्रीराम पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.