आनंदी नसाल, तर कामावर येऊ नका ! – चिनी आस्थापनाचा कामगारांना आदेश
कामगारांना वर्षाला मिळणार १० ‘दुःखी सुट्या’
बीजिंग – ‘पांग डाँग लाइ’ या आस्थापनाचे संस्थापक-अध्यक्ष यु डाँग लाइ यांनी अलीकडेच त्यांच्या आस्थापनातील कर्मचार्यांदा वर्षाला १० दिवसांची ‘दुःखी सुटी’ घोषित केली आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक जण आनंदी असेलच असे नाही. त्यामुळे आनंदी नसतांना कामावर येण्याची आवश्यकता नाही; उलट या वेळी कर्मचार्यांनी आराम करायला हवा, त्यांना आनंद मिळेल अशा गोष्टी त्यांनी करायला हव्यात, असे यु डाँग लाइ यांनी म्हटले आहे.
Don't come to work if not feeling happy ! – Chinese firm to employees
Employees to get 10 annual 'sad leaves'
Image Credits : @bsindia pic.twitter.com/dSg8mvLWxP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 16, 2024
या दृष्टीकोनातून त्यांनी ‘दुःखी सुटी’ किंवा ‘नाखूष सुटी ’ या संकल्पनेची घोषणा केली. विशेष म्हणजे या सुट्या कंपनीच्या व्यवस्थापनाकडून नाकारल्या जाणार नाहीत, याचीही हमी यु डाँग लाइ यांनी दिली आहे.
सौजन्य Business Standard
वर्ष २०२१ मध्ये चीनमध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६५ टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर थकल्यासारखे आणि अप्रसन्न वाटत असल्याचे समोर आले होते. यानंतर काम आणि खासगी आयुष्य यांचे संतुलन राखण्यासाठी आस्थापनेच्या रोजगार धोरणानुसार कर्मचार्यांना दिवसातून ७ घंटे काम करावे लागेल, असेही सांगण्यात आले होते. याखेरीज आठवड्याच्या शेवटी (शनिवार- रविवार) सुटी असेल आणि प्रत्येक वर्षाला ३० ते ४० दिवसांची सुटी असेल. ही घोषणा करतांना यु डाँग लाइ म्हणतात, ‘आम्हाला केवळ मोठे व्हायचे नाही, तर आम्हाला आमच्या कर्मचार्यांना निरोगी आणि आरामदायी आयुष्यसुद्धा द्यायचे आहे. यामुळेच आमची कंपनीसुद्धा प्रगती करू शकेल.