निवडणुकीच्या प्रसारासाठी पैशांचा उपयोग, नियमित १०० कोटी रुपये जप्त !
मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीत १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत अवैधरित्या वापरण्यात येत असलेली तब्बल ४ सहस्र ६५० कोटी इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. या ४५ दिवसांमध्ये देशात नियमित सरासरी १०० कोटी रुपयांची अवैध रक्कम पकडली जात आहे, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या लोकसभेच्या निवडणुकीत पकडण्यात आलेली ही सर्वांधिक मोठी रक्कम आहे, असे निवडणूक आयोगाने ‘एक्स’वर १५ एप्रिल या दिवशी पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.