२ संशयित नवी मुंबईतून कह्यात, एकाची ओळख पटली !
अभिनेता सलमान खान यांच्या घरावरील गोळीबाराचे प्रकरण
मुंबई – अभिनेते सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने २ संशयितांना नवी मुंबईतून कह्यात घेतले आहे. यांतील एका आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव विशाल राहुल उपाख्य कालू आहे. तो गुरुग्रामचा रहिवासी आहे. त्याच्यावर ५० हून अधिक गुन्हे नोंद आहेत.
या घटनेत वापरलेल्या दुचाकीच्या मालकाचा पोलिसांनी शोध घेतला. ही दुचाकी पनवेलमधील एका व्यक्तीच्या नावावर आहे. त्या मालकालाही पोलिसांनी कह्यात घेतले; पण त्याने काही दिवसांपूर्वी ती दुचाकी विकली होती.
गोळीबार केल्यावर फेसबूकवरून हत्येचे दायित्व स्वीकारण्यात आले होते. या फेसबूक खात्याचा आयपी अॅड्रेस कॅनडा येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.