मांगवली येथे अरुणा धरणाच्या कालव्याचे पाईप आगीत जळून खाक
वैभववाडी – तालुक्यात मांगवली येथे १४ एप्रिल या दिवशी लागलेल्या आगीत अरुणा धरणाच्या कालव्यासाठी ठेवण्यात आलेले पीव्हीसी पाईप जळून खाक झाले. यामुळे या परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेत अनुमाने २ कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर अरुणा प्रकल्पाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. सायंकाळी विलंबापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नव्हते.