कात्रज येथे आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू !
पुणे – कात्रज परिसरात ‘फॉरेन सिटी प्रदर्शना’मध्ये वडिलांसोबत गेलेल्या गणेश पवार या ८ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत् पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत ‘फॉरेन सिटी प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात लहान मुलांसाठी विविध खेळणी होती. गणेश आणि त्याचे वडील तेथे गेले असता गणेशचा विद्युत् पाळण्याच्या वीज प्रवाह उतरलेल्या जाळीला स्पर्श झाला. त्यामुळे विजेच्या झटक्याने तो कोसळला. विद्युत् पाळण्याचा वीज प्रवाह त्वरित खंडित करण्यात आला. बेशुद्धावस्थेतील गणेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.