दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बुलढाणा येथे मिरवणुकीत नाचतांना युवकाची हत्या; युवतीवर अत्याचार करणार्यावर गुन्हा नोंद…
बुलढाणा येथे मिरवणुकीत नाचतांना युवकाची हत्या
बुलढाणा – शहरात १४ एप्रिल या दिवशी निघालेल्या मिरवणुकीत जयस्तंभ चौकात आशुतोष संजय पडघान (२४) या तरुणावर अज्ञातांनी चाकूने वार करून त्याला गंभीर घायाळ केले. त्याला रुग्णालयात भरती केल्यावर उपचारांच्या वेळी त्याचा मृत्यू झाला.
युवतीवर अत्याचार करणार्यावर गुन्हा नोंद
युवतींनो, वेळीच सतर्कता बाळगा !
नाशिक – ऑनलाईन शिकवणीवर्गाच्या माध्यमातून ओळख झालेल्या संशयिताने येथील युवतीला शीतपयेयामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याचे ध्वनीचित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विवेक योगनारायण बोहरा असे त्याचे नाव आहे.
नाशिक येथे ६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
राज्यात गुटखाबंदी असतांना गुटख्याची विक्री होतेच कशी ?
नाशिक – येथील कलानगर परिसरातील एका बंगल्यातून ६ लाख ६० सहस्र रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित भारस्कर गरड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आहे. पोलिस आल्याचे कळताच गरड याने तेथून पलायन केले.
२ दिवस मुंबई, ठाणे आणि रायगड येथे उष्णतेची लाट !
मुंबई – मुंबई आणि ठाणे यांसह किनारपट्टी भागात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे २ दिवस म्हणजे १५ आणि १६ एप्रिल या दिवशी मुंबई, ठाणे आणि रायगड येथे उष्णतेच्या लाटेची चेतावणी देण्यात आली आहे. सरासरी तापमानात ४.५ अंश सेल्सिअसहून अधिक भर पडण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान ३७-३९ अंश सेल्सिअसपर्यंत रहाण्याची शक्यता आहे.
वातावरणातील कोरडेपणा आणि वाढती उष्णता यांमुळे हवामान विभागाने भरपूर पाणी पिण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
पुणे येथे किरकोळ वादातून धर्मांधाची प्रेयसीला मारहाण !
पुणे – किरकोळ वादातून प्रेयसीने बोलणे बंद केले. याचा राग मनात धरून सेफ मेमण या धर्मांधाने शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपी आणि तक्रारदार हे लहानपणापासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये २ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. १० दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर धर्मांधाने प्रेयसीला शिवीगाळ आणि मारहाण केली. (धर्मांधांची हिंसक वृत्ती ! – संपादक)