पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा आणणार्या ३ धर्मांधांना अटक !
नाशिक – मुंबई नाका पोलीस पथकातील अंमलदारांना शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी ३ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आवेश इम्रान अन्सारी (वय २७ वर्षे), जाकीर बसीर शहा (वय २२ वर्षे), आरिफ हामीद शहा (वय २४ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. ते मध्यरात्री एकमेकांना मारहाण करत होते. पोलिसांनी त्यांना कह्यात घेतल्यावर तिघांनी आरडाओरड करत वाहनाचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ केली. त्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक केली. ‘आम्ही न्यायालयात तुमच्याविषयी खोटी माहिती देऊ, पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केली, असे सांगू’, अशी धमकी ते पोलिसांना देत होते.
संपादकीय भूमिका :कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच लक्षण ! |