सर्वत्र अन्य धर्मियांची वाढत असलेली घुसखोरी हिंदूंसाठी धोक्याची घंटा ?
‘सध्या सर्वत्र हिंदु धर्मियांच्या वसाहतीत, तसेच त्यांच्या धार्मिक ठिकाणी अन्य धर्मीय घुसखोरी करून त्यांना त्रास देणे, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण करणे, त्यांच्या भूमी हडप करणे, हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या अंतर्गत फसवून त्यांचे धर्मांतरण करणे इत्यादी प्रकार वाढीस लागतांना दिसत आहेत. यासंबंधी प्रसारसेवेच्या निमित्ताने मी भारतभर प्रवास करतांना माझ्या लक्षात आलेली काही उदाहरणे येथे देत आहे.
१. महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये अन्य धर्मियांची वाढती वस्ती म्हणजे धोक्याची घंटा !
महाराष्ट्रातील एका गावात प्रत्येक ४ – ५ किलोमीटरच्या अंतरावर शेतामध्ये एखादी मशीद / थडगे आहे. तेथील काही लोकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘बर्याचशा हिंदु शेतकर्यांना त्यांच्या भूमी कुटुंबातील तरुण मुलांचे सहकार्य न मिळाल्याने, तसेच शेतात काम करायला कामगार न मिळाल्याने विकाव्या लागल्या. काहींच्या मुलांना अन्य धर्मीय मुलांनी व्यसनी आणि चंगळबाज बनवले. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून त्यांचा हक्क मागायला सांगून त्यांना भूमी विकायला भाग पाडले.’’
प्रत्येक गावाच्या वेशीवर अन्य धर्मियांनी त्यांची वस्ती वाढवली आहे आणि मशिदी बांधल्या आहेत. यामुळे गावावर कुठली आपत्ती अथवा आक्रमण झाले, तर गावकर्यांना बाहेरून साहाय्य मिळायला अडचण येईल, तसेच तिथे अन्य धर्मियांचे वर्चस्व असल्याने त्यांना हिंदूंचा संहार करणे पुष्कळ सोपे होईल, असे वाटले.
२. हिंदु संघटित नसल्याचा परिणाम !
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एका गावामध्ये धार्मिक, तसेच राष्ट्र-धर्मविषयक कार्य चालते. त्या गावामध्ये पूर्वी एकही अन्य धर्मीय नव्हता; परंतु गेल्या २-३ वर्षांपासून त्यांची संख्या वाढीस लागली आहे. त्यांनी त्या गावामध्ये जाण्या-येण्याच्या मार्गावर त्यांची छोट्या टपर्यांसारखी दुकाने थाटली आहेत. आरंभी एक व्यक्ती आली, नंतर त्यांनी अल्प कालावधीत त्याच्या अन्य साथीदारांना आणून त्यांनाही टपर्यांसाठी जागा मिळवून दिली. गावातील हिंदूंनी थोड्याशा मोबदल्यात त्यांना त्या जागा भाड्याने दिल्या. त्यांना धोक्याची सूचना देऊनही स्थानिक लोक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. उलट त्यांनी त्यांची चालू असलेली दुकानेही त्यांना चालवायला दिली आहेत. गावकर्यांमधील दोषांमुळे त्यांनी अल्प मोबदल्यात त्यांची दुकाने अन्य धर्मियांना दिली. त्यांना अन्य धर्मियांचे षड्यंत्र लक्षात आले नाही. त्यांचे प्रबोधन करूनही त्यांनी ऐकले नाही.
यामुळे आता त्या गावावर कुठल्याही प्रकारची आपत्ती आली, तर त्यांना साहाय्य मिळायला अडचण येऊ शकते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत अथवा प्रशासक यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. ‘तेथील स्थानिक हिंदूही संघटित नाहीत, याचाच हा परिणाम आहे’, असे मला वाटते.
३. ‘सनातन पंचांगा’ला विज्ञापन देत असल्याच्या कारणाने अन्य धर्मियांनी हिंदु व्यापार्यावर बहिष्कार टाकणे
कर्नाटकातील एका हिंदु दुकानदाराचे अन्य धर्मियांच्या पोषाखाचे दुकान आहे. त्यांनी ‘सनातन पंचांगा’ला विज्ञापन दिले, हे अन्य धर्मियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या दुकानावर बहिष्कार घातला. त्यामुळे त्या दुकानदाराला गेल्या २-३ वर्षांत पुष्कळ आर्थिक हानी सहन करावी लागली. परिणामी त्यांनी सनातनला अर्पण आणि विज्ञापन देणे थांबवले. मी त्यांची भेट घेतली असता त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही केवळ अर्पण देऊ शकता’’; परंतु त्यांनी यासाठीही नकार दिला. यावरून अन्य धर्मीय किती संघटित असतात, हे लक्षात येते. या उलट हिंदूंना सावध करूनही अजूनही आपले हिंदु बांधव त्यांच्याकडूनच खरेदी करतात.
४. हिंदूंनीही संघटित होणे महत्त्वाचे !
या सगळ्यातून मला असे जाणवले की, या सर्व प्रकरणांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अन्य राज्यांमध्येही तेथील स्थानिक शासन-प्रशासन यांनी त्यात लक्ष घालायला हवे. असे प्रकार जिथे जिथे होत आहेत, त्या ठिकाणी हिंदूंनीही संघटित होऊन योग्य तो निर्णय घ्यायला हवा आणि उपाययोजना काढायला हव्यात. अन्यथा या लेखात म्हटल्याप्रमाणे अन्य धर्मियांची वाढती वस्ती ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरून आत्मघात ठरू शकते’, असे मला वाटते.’
– एक साधिका (२९.३.२०२४)