मोशी (पुणे) मध्ये गरजणार ‘जय श्रीराम’ नामाचा गजर !
पुणे येथे श्रीरामनवमी उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे), १४ एप्रिल (वार्ता.) – ‘श्री नीलेशशेठ बोराटे सोशल फाऊंडेशन’ यांच्या वतीने ह.भ.प. बाळाजी रामजी आल्हाट क्रीडांगण, श्रीराम चौक, रिव्हर रेसिडेन्सी जवळ मोशी चिखली येथे श्रीरामनवमी उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ एप्रिलला सायं. ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई, प.पू. कालीचरण महाराज, ह.भ.प. शब्दप्रेमी श्री. संग्रामबापू भंडारे पाटील, त्र्यंबकेश्वर येथील ‘आनंद आखाड्या’चे गुरुवर्य श्री महंत गिरीजानंद सरस्वती महाराज, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या वेळी वेशभूषा स्पर्धा, फटाके आतीषबाजीसह महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्रीरामनवमी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमास अधिकाधिक भाविकांनी उपस्थित रहावे’, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.