जुन्नर (पुणे) येथे बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळून आला !
बर्फ बनवणार्या आस्थापनांकडे अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष !
पुणे – येथील जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे बर्फाची लादी विक्री करत असतांना एका लादीत चक्क मेलेला उंदीर आढळून आला आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे बर्फाचा वापर वाढला आहे. या बर्फातून अनेक ठिकाणी सरबत बनवले जाते. बर्फाचा गोळा, उसाचा रस, शीतपेये यांसाठी बर्फ वापरला जातो. यामुळे बर्फाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. खाद्यपदार्थांची शुद्धता पडताळण्याचे दायित्व अन्न आणि औषध प्रशासन विभागावर आहे; परंतु बर्फ बनवणार्या आस्थापनांकडे या विभागाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे सध्या दिसून येत आहे. ठिकठिकाणी कोणतेही पाणी वापरून बर्फ सिद्ध केले जात असतांना अधिकारी गप्प बसले आहे.
पुणे शहरात काही दिवसांपूर्वी ‘ऑटोमोबाईल कंपनीच्या कँटीन’मध्ये निरोध, तंबाखू, गुटखा, दगड कोंबलेले सामोसे मिळाले होते. त्यानंतर आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर मिळाला आहे; परंतु या सर्व प्रकारानंतरही अन्न आणि औषध प्रशासन विभाग शांत आहे. (नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या कर्तव्यचुकार अधिकार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. – संपादक)
संपादकीय भूमिकाबर्फ सिद्ध करतांना कोणतेही पाणी वापरले जात असतांना गप्प बसणार्या अधिकार्यांना कारागृहात डांबायला हवे ! |