गुरुदेवांसाठी सुमनांजली !
‘गुरुदेव, आपण सगुण आहात; कारण सगुणात वावरतांना दिसता म्हणून; पण आपणाला गुण स्पर्शतच नाही. माया स्पर्शूच शकत नाही. ‘सगुण’ असूनही आपण ‘निर्गुण’ आहात. साकार असूनही निराकार आहात. दृश्य असूनही अदृश्य आहात. ‘मायेत’ असूनही ‘मायातीत’ आहात. आपला देहच शुद्ध सत्त्वाचा आहे. सगुण गुरुदेवाची भक्ती, ही ‘गुणातीत’ परमात्म्याचीच उपासना आहे. गुरुदेव ! आपल्या अव्यभिचारी भक्तीने, आम्हाला परमात्म्याचे साधर्म्य प्राप्त होते.
आपल्या चरणी शतशः प्रणाम !
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०२३)