गुरूंच्या मनातील जाणून सूक्ष्मातील ज्ञानाच्या धारिकांच्या संकलनाची सेवा करणार्या सुश्री (कु.) दीपाली होनप !
‘मला गुरूंच्या कृपेमुळे अध्यात्मशास्त्रावर आधारित विविध विषयांवर सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होते. त्याचे मी संगणकीय धारिकेत टंकलेखन करतो. तेव्हा ही संगणकीय धारिका व्याकरण आणि संकलन यांच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यानंतर या धारिकेला अंतिम स्वरूप देण्याची सेवा माझी बहीण दीपालीताई (सुश्री (कु.) दीपाली होनप) करते. ही सेवा करतांना ती मला त्या धारिकेतील सूक्ष्मातील ज्ञानाविषयी काही शंका विचारते. तेव्हा ‘मूळ विषय आणखी वाढू नये’, या विचाराने मी त्या शंकांविषयी सूक्ष्मातून ज्ञान मिळवत नाही.
पुढे ही धारिका परात्पर गुरु डॉ. आठवले पडताळतात. दीपालीताईने मला पूर्वी ज्या शंका विचारलेल्या असतात, त्याच शंका परात्पर गुरु डॉक्टरांनी ती धारिका वाचून विचारलेल्या असतात. ते मला त्या शंकांची सूक्ष्मातून उत्तरे काढण्याचा निरोप पाठवतात. यावरून ‘दीपालीताईला ज्ञानाच्या धारिकेत येत असलेल्या शंका या ईश्वरी प्रेरणेनुसार आहेत’, हे लक्षात येते.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|