हिंदी चित्रपटसृष्टीतील जोडपी पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी विवाह करतात ! – अभिनेत्री नोरा फतेही
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील (बॉलीवूडमधील) जी जोडपी विवाह करतात, त्यांच्यात खरे प्रेम असत नाही. ती केवळ पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी विवाह करतात, असे मत अभिनेत्री नोरा फतेही यांनी एका मुलाखतीत मांडले.
Couples in the Hindi film industry marry for money and fame ! – Actress Nora Fatehi#BollywoodKiGandagi pic.twitter.com/G9SoUrfuoL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 14, 2024
नोरा फतेही म्हणाली की, हे लोक केवळ स्वार्थासाठी एकत्र रहातात. ही लोक अतिशय व्यावहारिक असतात. प्रसिद्धी मिळण्यासाठी ते एकमेकांचा वापर करतात. पैसा आणि सत्ता यांसाठी ते स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. ज्या व्यक्तीवर प्रेम करत नाही, तिच्याशी विवाह करतात आणि नंतर पश्चाताप करतात.