पंजाबमध्ये दिवसाढवळ्या विहिंपच्या नेत्याची हत्या

चंडीगड – पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात विश्‍व हिंदु परिषदेचे पदाधिकारी विकास प्रभाकर यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. दोघे आक्रमणकर्ते दुचाकीवरून आले होते. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हिंदु संघटनांनी या हत्येचा निषेध करत पंजाबच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍न उपस्थित केला आहे. ही घटना १३ एप्रिलला घडली.

सौजन्य The Headlines New Bharat

१. विकास प्रभाकर यांचे आनंदपूर साहिब जिल्ह्यातील नांगल भागात दुकान आहे. अवघ्या ३ महिन्यांपूर्वी त्यांची विहिंपच्या नांगलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.

२. १३ एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विकास प्रभाकर नांगल परिसरातील मिठाईच्या दुकानात उपस्थित होते. काही वेळाने शेजारील दुकानातील एक कर्मचारी त्यांच्याकडे गेला. त्या वेळी या कर्मचार्‍याला विकास खुर्चीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिसले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर तेथे विकास यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. जखमांमधून अधिक रक्तस्राव हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात आले.

३. एका हिंदु नेत्याने सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री हिंदूंच्या हत्यांच्या काळात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत विकास प्रभाकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याची घोषणा संतप्त आंदोलकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका 

आम आदमी पक्षाच्या राज्यात अल्पसंख्य असणारे हिंदू असुरक्षित ! हिंदु नेत्याच्या जागी एखादा मुसलमान किंवा शीख नेता असता, तर या घटनेवर देशभरात चर्चा झाली असती; मात्र हिंदु नेत्याची हत्या झाल्याने सर्वच जण शांत आहेत, हे लक्षात घ्या !