ट्रॅफिक सिग्नल’वर बळजोरीने पैसे मागणार्या तृतीय पंथियांवर पोलीस कारवाई करणार !
पुणे – ‘ट्रॅफिक सिग्नल’वर उभ्या असलेल्या वाहन चालकांकडून बळजोरीने पैशांची मागणी करणार्या तृतीय पंथियांवर फौजदारी संहिता प्रक्रियेच्या कलम १४४ अन्वये कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अन्वये जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि दंडाधिकारी अधिकार असलेल्या अधिकार्यांना सार्वजनिक उपद्रव रोखण्यासाठी, तसेच कायदा अन् सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राबवण्याचे आदेश देता येतात. तृतीयपंथी लोक पैसे न दिल्यास अश्लील आणि धमकावणारे वर्तन करतात. तसेच स्वेच्छेने पैसे देणार्या लोकांकडून अधिकचे पैसेही मागतात. म्हणून अशा प्रकारच्या उपद्रवी आणि जनतेला धोका निर्माण करणार्या घटकांना रोखण्याच्या दृष्टीने सदर आदेश दिले आहेत.
संपादकीय भूमिका :तृतीय पंथियांच्या रोजगाराची समस्या सोडवण्यासाठी काही ठोस उपाययोजना केल्यास त्यांचा उपद्रव न्यून होईल ! |