एका संतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये
१. सूक्ष्म परीक्षण करणारे संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण
१ अ. मारक शक्ती
१ अ १. मारक शक्तीच्या कणांचे वलय दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये कार्यरत होणे : यात राष्ट्ररक्षणासाठी प्रवृत्त करणारे आणि धर्मजागृती करणारे लेख प्रकाशित होत असल्याने असे होते.
१ अ २. मारक शक्तीचे कण दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वातावरणात, तसेच तो वाचणार्या व्यक्तीकडे प्रक्षेपित होणे : यामुळे व्यक्तीला धर्माचे महत्त्व समजते आणि ती व्यक्ती साधना, तसेच धर्मकार्य करण्यास प्रवृत्त होते.
१ आ. तारक शक्ती
१ आ १. तारक शक्तीच्या कणांचे वलय दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कार्यरत होणे : काही साधकांना ईश्वराकडून विविध विषयांवर ज्ञान मिळते आणि ते ज्ञान दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित केले जाते, तसेच अध्यात्माविषयी संतांनी केलेले मार्गदर्शनही त्यात प्रकाशित केले जाते. त्यामुळे असे होते.
१ आ २. तारक शक्तीचे कण दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वातावरणात, तसेच ते वाचणार्या व्यक्तीकडे प्रक्षेपित होणे
१ इ. सगुण चैतन्य
१ इ १. सगुण चैतन्याचे वलय दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कार्यरत होणे : याचे कारण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नेहमी सत्य प्रकाशित केले जात असून त्यात साधनेविषयी मार्गदर्शन असते.
१ इ २. सगुण चैतन्याचे वलय दैनिक ‘सनातन प्रभात’मधून वातावरणात, तसेच ते वाचणारे साधक किंवा सर्वसामान्य व्यक्ती यांच्याकडे प्रक्षेपित होणे : यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचणार्या व्यक्तीवर आध्यात्मिक उपाय होतात.
१ ई. निर्गुण चैतन्य
१ ई १. निर्गुण चैतन्याचे वलय दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कार्यरत होऊन ते वातावरणात, तसेच ते वाचणार्या व्यक्तीकडे प्रक्षेपित होणे : दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना व्यक्तीला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आणि देवतांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवू शकते, तसेच व्यक्तीचे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊ शकते.
१ उ. गुरुतत्त्व
१ उ १. गुरुतत्त्वाचे कण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कार्यरत होणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची छायाचित्रे आणि देवतांची चित्रे असतात. तसेच दैनिकात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि संत यांचे विविध विषयांवरील मार्गदर्शन प्रकाशित केलेले असते. यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गुरुतत्त्वाचे कण कार्यरत आहेत.
१ उ. आध्यात्मिक भाव
१ उ १. आध्यात्मिक भावाचे कण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कार्यरत होणे : साधकांना साधना करतांना आलेल्या भावानुभूती दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित केलेल्या असतात. या अनुभूती वाचून साधक आणि वाचक यांची भावजागृती होते. त्यामुळे असे होते.
१ उ २. आध्यात्मिक भावाचे कण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कार्यरत होऊन ते वातावरणात, तसेच ते वाचणार्या व्यक्तीकडे प्रक्षेपित होणे : यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना व्यक्तीला आध्यात्मिक भाव अनुभवता येतो.’
– सूक्ष्मातील जाणणारी एक साधिका (१४.३.२०२४)