सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?
‘समाजप्रबोधन आणि समाजोन्नती यांसाठी कटीबद्ध असलेल्या ‘सनातन प्रभात’चे नामकरण कधी आणि कसे झाले ?’, याविषयीचा प्रसंग आहे.
वर्ष १९९७ मध्ये प.पू. डॉ. आठवले यांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) सिंधुदुर्ग येथील देवगड तालुक्यात सार्वजनिक सभा होती. त्या निमित्ताने गुरुदेवांची पडेल येथील डॉ. रविकांत गोविंद नारकर यांच्याकडे निवासव्यवस्था होती. त्या वेळी डॉ. दुर्गेश सामंत, डॉ. नंदिनी सामंत आणि सांगलीतील इतर अन्य साधक, असे पुष्कळ जण आले होते. तेव्हा सर्वांना एकत्र करून दैनिक ‘सनातन प्रभात’चा आराखडा ठरवला जात होता.
गुरुदेवांनी उपस्थित सर्वांना ‘दैनिकाचे नाव काय असावे ?’, असे विचारले. ‘सनातन संदेश’, ‘सनातन प्रेरणा’, ‘सनातन प्रभात’, अशी नावे सुचवली गेली आणि त्यातील ‘सनातन प्रभात’ या नावाची निवड झाली. या ऐतिहासिक आणि दैवी घटनेची साक्षीदार होण्याची अनमोल संधी परमभाग्याने मला लाभली.
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर, पडेल, ता. देवगड, सिंधुदुर्ग. (१०.४.२०२४)