मेवातला (हरियाणा) ‘पाकिस्तान’ बनवण्यापासून वाचवा !
‘संपूर्ण भारताला इस्लामी राज्य बनवण्याची प्रक्रिया हळूहळू चालूच आहे; परंतु काही भागांमध्ये ती प्रक्रिया अत्यंत वेगाने चालू आहे. त्यापैकी एक आहे हरियाणा राज्यातील ‘मेवात’ हे ठिकाण ! या लेखात वेगवेगळ्या अहवालांच्या आधारे मेवातमधील परिस्थितीचे सविस्तर वर्णन दिले आहे.
मेवात हे भारताच्या राजधानी देहलीपासून केवळ ११४ किलोमीटर अंतरावर आहे. गुडगावपासून अलवरच्या मार्गाने पुढे गेल्यावर सोहना या भागानंतर ‘मेवात’चा भाग चालू होतो. मेवात एक मुसलमानबहुल भाग आहे. येथे ‘मेव’ जातीच्या मुसलमानांचा दबदबा आहे. हे मेव पूर्वी हिंदूच होते. ‘मेव’ ही एक जात आहे. आताही काही मेव हिंदू आहेत. मेवातचा भाग हरियाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या प्रदेशात पसरलेला आहे. १४ व्या शतकात तुघलक वंशाच्या राज्यकाळात मेवातच्या लोकांना बळजोरीने मुसलमान बनवण्यात आले. नंतरही हे लोक अनेक वर्षांपर्यंत स्वतःची ओळख जपून ठेवण्यात यशस्वी झाले होते; परंतु वर्ष १९२० नंतर विशेषतः शरीयत कायदा वर्ष १९२७ मध्ये झाल्यानंतर मुसलमानांच्या संघटनांनी तेथील हिंदूंचे धर्मांतर करण्याचे कार्य वेगात आरंभ केले. याचा दुष्परिणाम असा झाला की, येथील मुसलमान लोक ‘पाकिस्तान’च्या मागणीचे समर्थन करू लागले; परंतु जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हा येथील अत्यल्प मुसलमान पाकिस्तानात गेले; परंतु आता तर असे वाटते की, या लोकांनी मेवातलाच ‘पाकिस्तान’ बनवण्याचा चंग बांधला आहे. हरियाणाच्या मेवात क्षेत्रात चालू असलेल्या घटनांच्या अन्वेषणावरून हीच गोष्ट समोर येते.
१. मेवातच्या सर्व ५०८ गावांमध्ये नावालाही हिंदू शेष न रहाणे
हरियाणाच्या मेवात क्षेत्राला कट्टरतावाद्यांनी आधीपासूनच ‘बांगलादेश’ बनवला आहे. बांगलादेशात जवळजवळ ८ टक्के हिंदू राहिले आहेत. हीच स्थिती मेवातचीही झाली आहे. जेव्हा वर्ष १९४७ मध्ये बांगलादेशात जवळजवळ ३० टक्के हिंदू होते आणि मेवातमध्येही तेवढेच, म्हणजे ३० टक्के हिंदू होते. आता संपूर्ण मेवातला ‘पाकिस्तान’चा चेहरामोहरा देण्याचा प्रयत्न गतीने होत आहे. आज हरियाणाच्या मेवातमध्ये हिंदूंशी त्या सर्व बळजोरीच्या घटना होत आहेत, जसे बांगलादेश किंवा पाकिस्तान येथे हिंदूंना सतत दडपले जात आहे. हिंदु मुली आणि महिला यांचे अपहरण करणे, त्यांचे धर्मांतर करून एखाद्या मुसलमान व्यक्तीशी बळजोरीने विवाह लावून दिला जात आहे. हिंदूंना बळजोरीने मुसलमान बनवले जाते. हिंदु व्यापार्यांकडून बळजोरीने पैसे वसूल केले जातात. मंदिरे आणि स्मशान यांच्या भूमी हडप केल्या जात आहेत. बांगलादेशी घुसखोरांना वसवले जात आहे. हिंदूंना खोट्या खटल्यात गोवले जात आहे. हिंदूंच्या घरावर दिवसाढवळ्या दरोडा घातला जात आहे. त्यात भर म्हणजे येथील प्रशासनाकडूनही हिंदूंचीच उपेक्षा केली जाते, हे सर्वसामान्य झाले आहे. त्यामुळे मेवातचे हिंदू मेवात सोडून पलायन करत आहेत. मेवातच्या सर्व ५०८ गावांमध्ये हिंदू नावालाही शेष राहिलेले नाहीत. काही गावात हिंदूंचे २-४ कुटुंबेच शेष राहिली आहेत. जर सरकारची धर्मनिरपेक्ष वृत्ती पालटली नाही, तर येथे जे थोडेफार शेष राहिलेले हिंदूही पलायन करतील. नंतर या भागाला पाकिस्तान बनवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.
२. हिंदूंचा छळ
मेवात पूर्वी गुडगाव जिल्ह्याचा भाग होता. मेवातला ४ मे २००४ या दिवशी ‘जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले आणि नूंहला जिल्हा मुख्यालयाचा दर्जा देण्यात आला. मेवात जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७८४ वर्ग किलोमीटर आहे. मेवात जिल्ह्यात पुन्हाना, फिरोजपूर झिटका, नगीना, नूंह, तावडू आणि हथीन या ६ शहरी भागांतच हिंदू रहात आहेत. जे हिंदू श्रीमंत होते, ते गुडगाव आणि देहली इत्यादी शहरात जाऊन वसले आहेत. ज्या गरीब हिंदूंची कोणत्याही शहरी भागात घर विकत घेण्याची ऐपत नाही, ते नाईलाजाने त्यांच्या गावातच रहात आहे; परंतु त्यांची संख्या अत्यल्प आहे.
नूंहमधील मढी गावचे माजी सरपंच श्री. रामजी लाल यांनी सांगितले, ‘‘आमच्या गावात काही वर्षांपूर्वीपर्यंत २५ घरे हिंदूंची होती. आता तेथे केवळ चारच घरे शेष राहिली आहेत. जर त्यांनाही एखाद्या हिंदु शहरी भागात घर खरेदी करणे शक्य झाले असते, तर तेसुद्धा गावात मुळीच राहिले नसते. मुसलमानांनी त्यांची शेती स्वतःच्या कह्यात घेतली आहे. ते हिंदूंच्या लेकी सुनांना उचलून घेऊन जातात.’’ श्री. रामजी लाल हे जेव्हा गावचे सरपंच होते, तेव्हा त्यांनी गावातील मुसलमानांच्या दबावाखाली राहून कोणतेही हिंदुविरोधी काम केले नाही. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागत आहे. धर्मांधांकडून प्रतिदिन त्यांना ठार मारण्याची धमकी मिळते. नाईलाजास्तव त्यांना त्यांची भूमी आणि घर कवडीमोल किमतीत विकून पळून जावे लागले.
३. हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र !
जैन समाजाचे नूंहमधील अध्यक्ष अधिवक्ता विपिन कुमार जैन सांगतात, ‘‘मेवातमध्ये हिंदूंची दशा अत्यंत दुःखदायी आहे. संपूर्ण मेवातमधून हिंदूंना पळवून लावण्यासाठी जणू आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र रचले जात आहे. येथील हिंदूंना घाबरवण्यासाठी प्रतिदिन काही ना काही कुरापती काढल्या जातात. अगदी लहान लहान गोष्टींवरून हिंदूंना त्रास दिला जातो. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींना मुसलमान बनवले जात आहे. २५ मे २०१२ या दिवशी मेवली गावातील एका अग्रवाल परिवारातील मुलीचे अपहरण करण्यात आले आणि तिचा विवाह दोन मुलांचा बाप असणार्या मुसलमानाशी करून देण्यात आला. हिंदूंचे गार्हाणे कुणीच ऐकत नाही. मेवातमध्ये सरकारी योजनांमध्येही हिंदूंशी भेदभाव केला जातो. ‘मेवात विकास संस्था’ नावाची एक सरकारी संस्था आहे. त्या संस्थेचा वार्षिक अर्थसंकल्प ७० कोटी रुपयांचे आहे. त्या पैशांचा उपयोग केवळ मुसलमानांसाठीच केला जातो. मेवातमध्ये एक ‘ज्युनियर बेसिक टिचर ट्रेनिंग स्कूल’ असून त्यात एकूण ५० पदे आहेत; परंतु त्यातील २५ पदे मुसलमानांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत.’’
४. हिंदूंसाठी लाजिरवाणी गोष्ट
नगीना येथे रहाणारे श्री. वीर सिंह यांनी त्यांचे व्याही ओम वीर (भीमसिका, तालुका हथीन) यांच्याशी केल्या जाणार्या दुर्व्यवहाराविषयी सांगितले. ती घटना संपूर्ण हिंदु समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. वीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार ‘ओमवीर यांना काही दिवसांपूर्वी तबलिगी जमातीने फसवून मुसलमान बनवून त्यांना बाहेर पाठवले होते; परंतु ४ मासांनंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर ते परत आले आणि एक ‘हिंदु’ म्हणूनच राहू लागले. त्यानंतर त्यांना ठार मारण्याची धमकी मिळू लागली. ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आता गावाच्या बाहेर लपून छपून रहात आहेत. इकडे गावामध्ये त्यांची पत्नी आणि मुले यांना मुसलमान सतत त्रास देत आहेत. त्यांच्या मुलावर ‘कुराण’ फाडल्याचा आरोप लावण्यात आला होता की, जो नंतर चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. त्याच कालावधीत त्यांच्या मुलीशी माझ्या मुलाचा विवाह सुनिश्चित झाला होता. आम्ही वरात घेऊन त्यांच्या घरी पोचलो. तेवढ्यात तेथे त्या गावातील काही मुसलमान लोक पोचले आणि ते म्हणू लागले, ‘हा विवाह होऊ शकत नाही; कारण मुलीच्या वडिलांनी इस्लाम स्वीकारला आहे. त्यामुळे या मुलीचा विवाह एखाद्या मुसलमानाशीच होणार’; परंतु मुलीची आई त्यांचे सर्व बोलणेनाकारत राहिली आणि शेवटी पोलिसांच्या देखरेखीखाली तो विवाह पार पडला.’
५. हिंदूंनी मेवातमधून पलायन करावे, यासाठी हिंदु व्यापार्यांवर बहिष्कार टाकणे
एका बाजूला कोणत्याही हिंदु मुलीचा बळजोरीने एखाद्या मुसलमान पुरुषाशी विवाह करून दिला जातो. दुसरीकडे जर एखाद्या हिंदु मुलाने एखाद्या मुसलमान मुलीवर प्रेम केले, तर त्याला मुसलमान बनावे लागते. असे झाले नाही, तर संपूर्ण मुसलमान समाज हिंदूंवर तुटून पडतो. नगीना येथील रहिवासी भारत भूषण यांचा एकुलता एक मुलगा विशाल जैन हा एका मुसलमान मुलीच्या प्रेमपाशात अडकला. त्याला ‘वसीम अहमद’ बनून त्या मुलीशी निकाह, म्हणजे विवाह करावा लागला. आता तो वल्लभगडमध्ये रहातो. विशाल मुसलमान झाल्यानंतर तेथील मुसलमानांनी त्याच्या वडिलांना धमकावणे चालू केले. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी घरदार विकले. आता ते फरीदाबादमध्ये रहात आहेत. त्याच घटनेचा आधार घेऊन नगीनामध्ये रहात असलेल्या हिंदूंनाही उघडपणे धमकी दिली जात आहे की, या गोष्टीचा सूड घेण्यासाठी एका हिंदू मुलीला पळवून नेण्यात येईल. त्यामुळे तेथील हिंदूंनी पुष्कळ दिवस त्यांच्या मुलींना शाळा महाविद्यालयात पाठवलेच नाही.
मुसलमानांनी असाही फतवा काढला आहे, ‘कुणीही मुसलमान एखाद्या हिंदु दुकानदाराकडून कोणतेही सामान खरेदी करणार नाही.’ हिंदूंच्या दुकानांच्या बाहेर त्यांनी मुसलमान पहारेकरी बसवले आहेत. त्यांना हेच काम दिले आहे, ‘जर एखादा मुसलमान एखाद्या हिंदु दुकानदाराकडून सामान खरेदी करतांना दिसला, तर त्याला पकडण्यात यावे.’ अशा प्रकारे हिंदूंवरील बहिष्कार पुष्कळ दिवसांपर्यंत चालू होता. मेवातमधील हिंदूंचे म्हणणे आहे की, हिंदु दुकानदारांवर प्रतिदिन कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने बहिष्कार टाकला जात आहे. त्याचे मुख्य २ उद्देश आहेत.
अ. पहिले म्हणजे हिंदूंना मेवातमधून पळवून लावणे.
आ. दुसरे म्हणजे हिंदूंच्या दुकानातील उधारीचे पैसे बुडवणे होय.
असे समजले जाते की, येथील मुसलमान हिंदु दुकानदारांकडून उधारीवर सामान खरेदी करतात आणि जेव्हा उधारीचे पैसे अधिक होतात, तेव्हा त्यांच्यावर बहिष्कार टाकतात. हिंदूंचे म्हणणे आहे की, त्यांना उधारीवर सामान देणे, हा आमचा नाईलाज असतो आणि जर आम्ही उधारीवर त्यांना सामान दिले नाही, तरी आम्हाला ते अडचणीचे होते.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. अरुण कुमार सिंह, देहली.
(साभार : ‘हिंदु रायटर्स फोरम’, नवी देहली)