अहिंसा व्रत
साधकाने आपल्या साधनेचे एक महत्त्वाचे अंग या दृष्टीनेच अहिंसेकडे पहावे. हे अंगदेखील चोवीस तास सांभाळावे लागते. दर क्षणाला आपली वागणूक, बोलणे किंवा न दिसणारे खोलवर विचार यांतून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मानसिक किंवा शारीरिक स्तरावर कुणीही दूरचा आणि जवळचा दुखावला जाऊ नये, याचा आटोकाट प्रयत्न करावा. त्यातूनही काही घडलेच, तर पश्चात्तापयुक्त क्षमा मागावी.’- स्वामी विद्यानंद (साभार: ग्रंथ ‘चिंतनधारा’)