स्त्रियांनी साडीचा पदर मोकळा सोडण्यापेक्षा तो कंबरेला खोचणे लाभदायी असणे ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘पूर्वी स्त्रिया प्रतिदिन साडी नेसत आणि साडीचा पदर डाव्या खांद्यावरून घेऊन नंतर तो उजव्या बाजूने घेऊन पदराचे टोक पोटाजवळ नाभीकडे खोचत असत. आताच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रिया व्यवसाय किंवा चाकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात. त्यामुळे स्त्रियांचे साडी नेसण्याचे प्रमाण उणावले आहे, तसेच आजकाल साडी नेसतांना साडीचा पदर डाव्या खांद्यावरून घेऊन नंतर तो मागे मोकळा सोडण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे.
‘स्त्रियांनी साडीचा पदर मोकळा सोडणे किंवा तो कंबरेला खोचणे या कृती केल्याने त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे एक संशोधनात्मक चाचणी करण्यात आली. या चाचणीत पुढील २ प्रयोग करण्यात आले. या प्रयोगात आध्यात्मिक त्रास तीव्र असलेली १ स्त्री आणि आध्यात्मिक त्रास नसलेली १ स्त्री सहभागी झाल्या.
प्रयोग १. साडीचा पदर मागे मोकळा सोडणे : या प्रयोगात स्त्रियांनी सहावारी साडी नेसून पदर मागे मोकळा सोडल्यावर १० मिनिटांनी त्यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ने चाचण्या करण्यात आल्या.
प्रयोग २. साडीचा पदर कंबरेला खोचणे : या प्रयोगात स्त्रियांनी सहावारी साडीचा पदर कंबरेला खोचल्यानंतर १० मिनिटांनी त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.
या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन अन् निष्कर्ष पुढे दिले आहेत.
१. स्त्रियांनी साडीचा पदर कमरेला खोचल्यावर त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे
पहिल्या प्रयोगात स्त्रियांनी साडीचा पदर मोकळा सोडलेला असतांना त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. दुसर्या प्रयोगात त्यांनी साडीचा पदर कमरेला खोचल्यानंतर १० मिनिटांनी पुन्हा त्यांच्या चाचण्या केल्यावर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. ते पुढील तक्त्यात दिले आहे.
टीप – सध्याचा काळ अतिशय रज-तमप्रधान असल्याने व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांच्यावर रज-तमात्मक (त्रासदायक) स्पंदनांचे आवरण येते. त्यामुळे चाचणीतील आध्यात्मिक त्रास नसलेल्या स्त्रीमध्येही त्रासदायक स्पंदने आढळून आली. या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होण्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन स्वतःवरील आवरण अधून-मधून काढणे आवश्यक आहे. आवरण काढण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग करू शकतो, उदा. विभूती लावणे, गोमूत्र शिंपडणे, स्तोत्र म्हणणे किंवा ऐकणे, नामजप करणे इत्यादी.
२. निष्कर्ष
स्त्रियांनी साडीचा पदर कंबरेला खोचणे त्यांच्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे, हे या प्रयोगातून लक्षात येते.
स्त्रियांनी किमान घरात असतांना साडी नेसावी, तसेच घरातील विविध कामे करतांना साडीचा पदर मोकळा न सोडता, तो कंबरेला खोचावा. त्यामुळे त्यांना कामांसाठी आवश्यक ऊर्जा मिळेल आणि त्रासदायक स्पंदनांपासून त्यांचे रक्षण होईल.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.१२.२०२३)
इ-मेल : mav.research2014@gmail.com
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |