शास्त्रदृष्टी बाळगून सनातन परंपराचा अभ्यास करा !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
‘शास्त्र आहे येथे कसला पक्षपात ? कसला जुलूम ? सनातन श्रद्धेच्या संदर्भातील चिंतन कुणीही छापत नाही. आवाजच जात नाही. नव्हे तर सनातन प्रणालीचे लेखन अजिबात प्रसिद्ध होऊच नये. ते दडपून टाकता आल्यास बरेच आहे, अशा तर्हेची रानटी आणि मत्सरी विचार पद्धत सर्वत्र प्रचलित आहे.
सनातन विचारप्रणालीवर सत्तेच्या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो. ते खरे सार आहे. खरा जिवंतपणा आहे. त्यामुळेच ते अनेक प्रकारच्या दिव्यातून टिकेल. आज ना उद्या सर्व राष्ट्रास शिरोधार्य वाटेलच.
आजच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळण्याकरता मूळ सनातनी (सनातन धर्माची) धारणा काय आहे, हे पहाणे अत्यंत आवश्यक आहे. ती सनातन धारणा समजावून घेतली, तर आज हे जे आधुनिक मूल्यांचे मंथन चालू आहे, त्यातील ती वैगुण्ये दूर करता येतील.
शुद्ध शास्त्रीय दृष्टीकोन ठेवा. कोणत्याही दुराग्रहामध्ये फसू नका. प्रत्येक समस्येविषयी सनातनी हिंदूंची धारणा काय आहे ? ते पहा. समजून घ्या. केवळ शास्त्रदृष्टी बाळगून आमच्या सनातन परंपरांचा अभ्यास करा. यथार्थ ज्ञान लोकांसमोर ठेवा.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०२३)