Ratnagiri Love Jihad:फसवणूक, धमक्या आणि मारहाण केल्याच्या प्रकरणी धर्मांधांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद

रत्नागिरीतील लव्ह जिहादचे प्रकरण !

रत्नागिरी – तालुक्यातील शिरगाव येथील सौरभ राकेश मंडल यांनी साखरतर येथील बासिद मेहताब साखरकर, त्याचे वडील मेहताब साखरकर आणि २ अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात फसवणूक करणे, धमकी देणे आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भा.दं.सं. १८६० अन्वये ५०९, ३२३, ५०४, ५०६, ३४ या कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांत केलेल्या तक्रारीत सौरभ राकेश मंडल यांनी म्हटले आहे की,

१. आई लक्ष्मी आणि वडील राकेश असे आम्ही एकत्र कुटुंबात रहात आहोत. माझे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

२. माझ्या बहिणीचे मागील दीड वर्षांपासून बासिद मेहताब साखरकर याच्याशी प्रेमसंबंध आहेत.

३. माझी बहीण काही दिवसांपूर्वी बासिद याच्यासमवेत घरातून निघून गेली. ती २ दिवसानंतर घरी परत आल्यानंतर त्या दोघांना घेऊन मी पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी बासिदला समज दिली होती.

४. त्यानंतर  बहिणीने चिपळूण येथील संजीवनी नर्सिंग कॉलेज येथे प्रवेश घेतला. ती तेथे हॉस्टेलमध्ये रहात होती. २७.२.२०२४ या दिवशी तिला तिचा मित्र बासिद साखरकर हा तिचे ट्रेनिंग चालू असलेल्या हॉस्पिटलला सोडायला गेला. त्या वेळी तिला चक्कर आली असल्याने तो तिला उचलून हॉस्पिटलमध्ये घेवून गेला आणि त्याने ती त्याची बायको आहे असे सांगितले.

५. ही गोष्ट माझ्या आईला तेथील सरांनी फोनवरून कळवली. त्या वेळी बहिणीने ती बासिदसमवेत गेल्याची चूक मान्य केली. त्यानंतर २८ फेब्रुवारीच्या सकाळी ६ वाजल्यापासून ती हॉस्टेलमधून निघून गेल्याचे तेथील ‘शिक्षिकेने फोनद्वारे आम्हाला कळवले.

६.  बहिणीला इतके समजावूनही ती बासिद याचेबरोबरच गेली असेल, असे वाटून आम्ही तिच्याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही; कारण ऑक्टोबर २०२३ मध्ये बासिद याचे वडील मेहताब यांनी आमच्या घरी येऊन आईला अश्लील आणि घाणेरडे बोलत  धमक्या दिल्या होत्या.

७.  ८ एप्रिलला दुपारी १.३० वा. मी टिळकआळी येथील ‘माय जीओ शाँप’च्या समोर बासिद साखरकर दिसल्याने त्याच्याकडे माझी बहीण कुठे आहे आणि कशी आहे ?याविषयी विचारणा केली. त्या वेळी बासिद याने ‘हिंदूंच्या मुली आम्ही वापरतो आणि सोडून देतो, तुझ्या बहिणीला पण वापरून सोडून दिली आहे. तूच शोध, ती तुला शोधून सापडणार नाही’’, असे बोलत अतीशय घाणेरड्या शिव्या देत आणि मारहाण करून धमकी दिली. त्यानंतर त्याने त्याचे वडिलांना मेहताब यांना फोन करून बोलावले. त्यानंतर त्याने आणि त्यांच्या वडिलांनी, तसेच अन्य २ अनोळखी इसमांनी मला मारहाण केली.

८. मित्राच्या सहकार्याने मी सुटलो आणि आम्ही तक्रार केली.

हिंदूंनो, धर्मांध मुसलमानांची मानसिकता जाणा आणि जागे व्हा !

सौरभ राकेश मंडल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२३ मध्ये बासिद याचे वडील मेहताब साखरकर यांनी आमच्या घरी येऊन माझ्या आईजवळ ‘हिंदूंच्या मुली आमच्या …….साठीच असतात, माझी वरपर्यंत ओळख आहे, काय करायचे ते करा. तक्रार केलीत, तर तुमच्या मुलीला आणि तुम्हाला ठार मारू’, अशा धमक्या दिल्या होत्या.

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहादला थोतांड म्हणणारे अथवा ‘प्रेमाकडे धर्माच्या चष्म्यातून पाहू नका’, असा उपदेशाचा डोस हिंदूंना पाजणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी या प्रकरणात तोंड उघडतील का ?
  • सरळ सरळ जिवे मारण्याच्या धमक्या देणार्‍या धर्मांध मुसलमानांना कायद्याचे भयच राहिले नसल्याचे स्पष्ट होत असतांना पोलिसांनी त्यांच्या विरोधात केवळ गुन्हा नोंदवून स्वस्थ न बसता त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
  • हिंदूंनो, तुमच्या मुलींची फसवणूक, धमक्या आणि तुम्हाला मारहाण करणार्‍या मुसलमानांना आता तरी ओळखाल का ?